भारतात प्रादेशिक जोडणी सुधारण्यासाठी ADBकडून $150 दशलक्षाचे कर्ज

भारतामधील पश्चिम बंगाल आणि उत्तर-पूर्व प्रदेशात रस्ते परिवहन आणि आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गिकेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी वित्त पुरवठा चालू ठेवण्याकरिता भारत सरकारने आशियाई विकास बँक (ADB) सोबत $150 दशलक्ष इतक्या रकमेचा कर्ज करार केला आहे.

हा करार $500 दशलक्षाच्या दक्षिण आशिया उप-प्रादेशिक आर्थिक सहकार्य रस्ते संपर्क गुंतवणूक कार्यक्रमाचा भाग आहे.

2014 साली मंजूर झालेल्या या कार्यक्रमामधून भारताच्या उत्तर बंगाल आणि ईशान्य भागात सुमारे 500 किलोमीटर रस्त्यांचा विस्तार केला जात आहे.

आशियाई विकास बँक (ADB) ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली.

ही बँक UN इकोनॉमिक कमीशन फॉर एशिया अँड फार ईस्ट (UNESCAP) आणि गैर क्षेत्रीय विकसित देशांच्या सदस्यांना सामावून घेते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: