भारतात तंबाखूयुक्त धुम्रपानामध्ये घट: WHO

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार, भारतात तंबाखूयुक्त धुम्रपानामध्ये तीव्र घट झाली आहे. भारतात धुम्रपानाचे प्रमाण 2000 साली 19.4% इतके होते, जे 2005 साली 11.5% पर्यंत घसरले आहे. WHO च्या अंदाजानुसार, ही घट अशीच राहिल्यास धुम्रपानाचे प्रमाण सन 2020 पर्यंत 9.8% असेल आणि ते 2025 सालापर्यंत 8.5% राहील.

जागतिक आरोग्य संघटना  (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे. 7 एप्रिल 1948 रोजी स्थापित WHO चे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) मध्ये मुख्यालय आहे. WHO हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: