भारताच्या जीडीपी मध्ये वाढ

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी मागील 15 तिमाहीतील सर्वोच्च कामगिरी आहे.

मागील वर्षी वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर अर्थव्यवस्थेचा वेग काहीसा मंदावला होता. त्यामुळे जीडीपीत घसरण होत विकासदर 5.6 टक्क्यांवर पोचला होता.

2011-12 च्या आधारभूत किंमतीनुसार, 2018-19 च्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 33.74 लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या निवेदनात मांडण्यात आला आहे. मागील वर्षातील (2017-18) च्या पहिल्या तिमाहीत तो 31.18 लाख कोटी रुपये होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: