भारताचे नवे महाधिवक्ता – तुषार मेहता

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारताच्या महाधिवक्तापदी ज्येष्ठ विधिज्ञ तुषार मेहता यांची नियुक्ती केली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये रंजीतकुमार यांनी राजीनामा दिल्यामुळे मागील ११ महिन्यांपासून महाधिवक्ताचे पद रिकामे होते.

 

तुषार मेहता –

Image result for तुषार मेहता

तुषार मेहता हे गुजरातचे असून सध्या ते अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत.

भाजपाची केंद्र सरकारमध्ये सत्ता आल्यानंतर २०१४ मध्ये मेहता यांना अतिरिक्त महाधिवक्ता म्हणून नेमण्यात आले होते. मेहता यांनी माहिती अधिकार कायदा कलम ६६ अ प्रकरणी केंद्र सरकारची बाजू मांडली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्याबाबत एका वेबसाइटवर वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जय शाह यांनी या वेबसाइटच्या पत्रकारांवर मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रसंगी तुषार मेहता यांनी केंद्र सरकारची विशेष परवानगी घेऊन जय शाह यांच्याकडून ही खटला लढवला होता.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: