भारत-अमेरिकेचे व्यापारयुध्द

अमेरिकेने चीन आणि भारताबरोबर व्यापार युद्ध सुरु केले आहे. अमेरिकेने केलेल्या करवाढीमुळे भारतातून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कर लादून अमेरिकेला त्यातून २४१ मिलियन डॉलरचा फायदा होणार आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून आयात होणऱ्या महागडया मोटार सायकल, काही लोखंडी-स्टीलच्या वस्तू, बोरिक अॅसिड आणि डाळींवर ५० टक्क्यापर्यंत सीमा शुल्क वाढवण्यात येणार आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी जूनच्या अखेरीस दोन्ही देशांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक आयोजित केली जाणार आहे. पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरील आयात कर, वैद्यकीय उपकरणांच्या किमती, निर्यातीसंदर्भातील सवलती अशा अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांत धोरणात्मक मतभेद असले तरी, ते सोडवण्यासाठी अमेरिका सकारात्मक विचारसरणी ठेवून आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: