‘बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देणारी योजना’

प्राप्तीकर विभागाने ‘बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देणारी योजना-2018’ सुरू केली आहे.अशा व्यवहारांबाबत प्राप्तीकर विभागाच्या तपास संचालनालयाच्या बेनामी प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना विशिष्ट माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकेल. परदेशातील व्यक्तीही या बक्षीसासाठी पात्र आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले जाणार नाही.

बेनामी मालमत्ता व्यवहार अधिनियम 1988 अनुसार बेनामी व्यवहार आणि मालमत्तेबाबत तसेच अशा मालमत्तांवर उत्पन्न मिळवणाऱ्यांची माहिती देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: