बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे ‘टिटली’ चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना चक्री वादळाच्या विपरीत परिणामांना समोर जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. राज्यात सर्वाधिक जास्त कमाल तापमान अकोला येथे ३७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ आहे.

हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ११ आॅक्टोंबरला धडकण्याची शक्यता आहे़.

यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० किमी इतका असू शकतो़. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़.

तसेच ११ व १२ आॅक्टोंबरला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मेझोराम, त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: