‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखांचे विलीनीकरण

राज्यात सर्वाधिक शाखा असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रने देशभरातील ५१ शाखांचे विलीनीकरण केले आहे. त्यात महाराष्ट्रातील ३५ शाखांचा समावेश आहे.

खर्च कपातीसाठी पुढील तीन विभागीय कार्यालये विलीन केली आहेत-

१) मुंबई उपनगर विभागीय कार्यालय मुंबई शहरात

२) रायगड विभागीय कार्यालय ठाण्यात

३) पुणे पश्चिम विभागीय कार्यालय पुणे शहरात

९,६०० कोटींच्या बुडीत कर्जांमुळे बँक १२०० कोटींचा तोटा सहन करीत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी बँकेने खर्च कपात सुरू केली आहे. त्यातूनच शाखा विलीन केल्या आहेत.

यामध्ये ठाण्यातील सर्वाधिक ७ शाखा, मुंबईतील ६ व पुण्यातील ५ शाखा आहेत. जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, रायपूर, चेन्नई, गोवा, रायपूर, नॉयडा, कोलकाता, चंदीगड येथील शाखांचाही विलीनीकरणात समावेश आहे. बँकेच्या देशभरात १९०० व राज्यात ४५० शाखा आहेत.

शहरातील जागेच्या भाडेदरात सातत्याने वाढ होत आहे; परंतु तुलनेत व्यवसाय वाढत नसल्याने शाखा तोट्यात होत्या. त्यामुळेच खर्चात कपातीसाठी बँकेने हा निर्णय घेतला.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: