फोर्ब्सची ६० स्वःकर्तृत्ववान श्रीमंत महिलांची यादी जाहीर

स्वःकर्तृत्वाच्या बळावर आपली ओळख प्रस्थापित केलेल्या अमेरिकेतील श्रीमंत महिलांची यादी ‘फोर्ब्ज’ने प्रसिद्ध केली असून, त्यात जयश्री उल्लाल आणि नीरजा सेठी या दोन मूळ भारतीय वंशांच्या महिलांना स्थान मिळाले आहे.

एबीसी सप्लाय कंपनीच्या डायने हेंड्रिक्‍स या यादीत अव्वल स्थानी आहेत. त्या आच्छादने, खिडक्‍या यांच्या मोठ्या वितरक म्हणून परिचित आहेत.

मूळ भारतीय वंशाच्या जयश्री उल्लाल यांनी १.३ अब्ज डॉलरच्या (८८०० कोटी) मालमत्तेसह या यादीत १८ वे स्थान प्राप्त केले आहे; तर नीरजा सेठी २१ व्या स्थानावर आहेत. त्यांची मालमत्ता १ अब्ज डॉलर (६८०० कोटी) इतकी आहे.

२१ वर्षीय अमेरिकन रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनर हिने सर्वांत कमी वयात अब्जाधीश होण्याचा विक्रम केला आहे. कमी वयामध्ये सर्वाधिक कमाईच्या बाबतीत काइली जेनरने फेसबुकचा निर्माता मार्क झुकरबर्गलाही मागे टाकले आहे. आतापर्यंत झुकरबर्ग हा सर्वांत तरुण वयात झालेला अब्जाधीश ठरला होता. काइली जेनरने वयाच्या १०व्या वर्षी ‘कीपिंग अप विद द कर्दाशियन’ या रिअ‍ॅलिटी शोमधून पदार्पण केले होते. काइली जेनर किम कर्दाशियनची छोटी बहीण आहे. पाच बहिणींमध्ये काइली जेनर सर्वांत लहान आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: