फिफा विश्वचषक २०१८

‘फिफा विश्वचषक स्पर्धा- २०१८’ या स्पर्धेचे उदघाटन १४ जून २०१८ रोजी रशियाची राजधानी माँस्को येथील लुझनिकी क्रीडा मैदानावर करण्यात आले आहे. FIFA World Cup 2018 या स्पर्धेतील सामन्यांसाठी वापरण्यात येणारा ‘टेलस्टार १८’ हा फुटबॉल पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आला आहे. पाकिस्तनामधील सियालकोट या शहरात हा फुटबॉल बनवण्यात आला असून ‘आदिदास’ या ख्यातनाम क्रीडा कंपनीने या फुटबॉल डिझाईन केला आहे. टेलस्टार हा फुटबॉल प्रथम १९७० साली मेक्सिको येथे वापरण्यात आला होता.

फिफा विश्वचषक स्पर्धा रशियात काल १४ जूनपासून सुरु झाली आहे. यंदाच्या ‘फिफा विश्वचषक’ विजेत्या संघाला १८ कॅरेट सोन्याच्या चषकासोबतच २२५ कोटी रुपयांचा रोख पुरस्कार मिळणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: