प्रा. अभय अष्टेकरांना आइन्स्टाइन पुरस्कार

गुरुत्वाकर्षण विज्ञानात चार दशकांपासून कार्यरत भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ प्रा. अभय अष्टेकर यांना प्रतिष्ठेचा आइन्स्टाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीने ही घोषणा केली आहे.


पेन्सेल्व्हिनिया स्टेट यूनिवर्सिटीच्या इन्स्टिट्यूट फॉर ग्रॅव्हिटेशन अँड द कॉसमासचे निर्देशक असलेले अभय अष्टेकर यांना हा पुरस्कार सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्समधील योगदानाबद्दल देण्यात येत आहे.


अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे अष्टेकर यांना आइन्स्टाइन पुरस्काराच्या स्वरूपात १० हजार डॉलर मिळणार आहेत. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची सुरुवात १९९९ मध्ये झाली होती.


प्रा. अभय अष्टेकर –

Related image

अष्टेकर यांचा जन्म ५ जुलै १९४९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे बालपण आणि शिक्षण मुंबईत झाले. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचे काम केले आहे. अष्टेकर यांनी १९७४ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच.डी प्राप्त केली. त्यांनी फ्रान्स, कॅनडा आणि भारतात महत्वाच्या पदावर काम केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: