प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचे निधन

ब्र, भिन्न आणि कुहू या गाजलेल्या कादंबरींच्या लेखिका आणि कवियत्री कविता महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

कविता महाजन यांचा जन्म नांदेडमध्ये झाला होता. मराठी विश्वकोषाचे माजी सचिव एस. डी. महाजन यांच्या त्या कन्या होत्या.

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांनी मराठी साहित्य या विषयामध्ये एम.ए. ही पदवी मिळविली होती.

मिळालेले पुरस्कार – 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (२००८)

कवयित्री बहिणाबाई पुरस्कार (२००८)

साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला, २०११)

मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: