प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचे निधन

हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचे दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले आहे.

४ जानेवारी १९२५ रोजी जन्मलेल्या निरज यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली आहेत.

१९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

त्यांना तीन वेळेस फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आले होते.

नीरज यांचे मेरा नाम जोकर या चित्रपटातील ‘ए भाय, जरा देख के चलो’ हे गाणे अतिशय लोकप्रिय ठरले. या गाण्यासाठी त्यांना १९७२मध्ये फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: