प्रवाळी प्रदेशाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात सनस्क्रीनवर बंदी

पलाऊ देशाने प्रवाळी प्रदेशाचे (coral reef) संरक्षण करण्यासाठी प्रवाळाला विषारी ठरणाऱ्या सनस्क्रीनवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 जानेवारी 2020 पासून ही बंदी लागू होणार आहे.

रासायनिक प्रदूषणापासून प्रवाळी प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी जगात घेतला गेलेला हा पहिलाच पुढाकार आहे.


पलाऊ द्वीप  –

Related image

पलाऊ हा 500 प्रशांत बेटांचा एक द्वीपसमूह आहे, जो पश्चिम प्रशांत महासागरामधील मायक्रोनेशिया प्रदेशाचा भाग आहे.

नगरुलमड ही देशाची राजधानी आहे आणि युनायटेड स्टेट्स डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

पलाऊला जगातले सर्वोत्तम डायविंग गंतव्यांपैकी एक मानले जाते.

पलाऊमध्ये 2009 साली जगातले पहिले शार्क अभयारण्य तयार करण्यात आले.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: