प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY)

भारत सरकारची महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) आता अमर्यादित कालावधीसाठी (open-ended scheme) चालवली जाणार आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाय 5,000 रूपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत या प्रमाणात ओव्हरड्राफ्ट (जादा रक्कम) सुविधा दुप्पट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) -

प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) लोकांना बँकेत खाती उघडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ऑगस्ट 2014 मध्ये चार वर्षांच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आली होती.

आर्थिक समावेशन करण्याकरिता राष्ट्रीय मोहिमेच्या स्वरुपात सुरू करण्यात आलेल्या या योजनेमधून सर्वसामान्य लोकांना बँक खाती, विमा आणि निवृत्तीवेतन सारख्या आर्थिक सेवांचा लाभ मिळू शकतो.

या योजनेच्या अंतर्गत आजपर्यंत एकूण 32.41 कोटी खाती उघडण्यात आली आहेत आणि आतापर्यंत त्यात 81,200 कोटी रुपये जमा झाले आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: