‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’

प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) –

केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (PM-AASHA) या नवीन एकीकृत योजनेला मंजुरी दिली आहे. सरकारने यापूर्वीच खरीप पिकांसाठी किमान हमी भाव उत्पादन खर्चाच्या दीड पट वाढवला आहे.

2018 सालच्या अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य दर सुनिश्चित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या नवीन एकीकृत योजनेत शेतकऱ्यांना योग्य दर देण्याची यंत्रणा समाविष्ट असून यात – मूल्य समर्थन योजना (PSS), मूल्य तफावत भरणा योजना  (PDPS), प्रायोगिक खासगी खरेदी आणि साठवणूक योजना (PPPS) अंतर्भूत आहेत.

भात, तांदूळ आणि पोषक धान्ये/ भरड धान्ये खरेदीसाठी अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या तसेच कापूस आणि ज्यूट यांसाठीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सध्या सुरु असलेल्या योजना शेतकऱ्यांना या पिकांसाठी किमान हमी भाव देण्यासाठी सुरु राहतील.

प्रायोगिक तत्वावर खरेदीत खासगी क्षेत्राचा सहभाग चाचपून पाहण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्याआधारे त्यांचा खरेदी प्रक्रियेतील सहभागाची व्याप्ती वाढवता येईल. म्हणूनच तेलबियांसाठी निवडक जिल्ह्यात खासगी खरेदी साठा योजना सुरु करण्याचा पर्याय राज्य सरकारांकडे आहे.

याद्वारे निवडक खासगी संस्था अधिसूचित कालावधीत अधिसूचित बाजारपेठेत किमान हमी भावाने खरेदी करू शकतील आणि जेव्हा बाजारातील भाव कोसळतील तेव्हा अधिसूचित किमान हमी भावाच्या 15% कमाल सेवा शुल्क आकारले जाईल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: