प्रख्यात सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन

प्रख्यात सूरबहार वादक अन्नपूर्णा देवी (९१) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. कृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


अन्नपूर्णा देवी –

Image result for अन्नपूर्णा देवी

अन्नपूर्णा देवी यांचा जन्म मध्य प्रदेशातील मैहर येथे सन १९२७मध्ये झाला. प्रसिद्ध संगीतकार अल्लाउद्दीन खान त्यांचे वडील. त्यांच्याकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार व सूरबहार वादनावर हुकूमत मिळवली. पुढे सूरबहार या वाद्याशी त्यांचे नाव जोडले गेले.

प्रख्यात सतारवादक पंडित रवी शंकर यांच्याशी त्यांचा पहिला विवाह झाला होता. रवी शंकर आणि अन्नपूर्णा देवी यांनी २१ वर्षे संसार केला. त्यानंतर ते विभक्त झाले.

रवी शंकर यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी ऋषीकुमार पांड्या यांच्यासोबत विवाह केला. ऋषीकुमार मॅनेजमेंट कन्सल्टंट होते. त्यांचे सन २०१३मध्ये निधन झाले.


अन्नपूर्णा देवी यांना मिळालेले पुरस्कार –

शास्त्रीय संगीतातील अतुलनीय योगदानासाठी केंद्र सरकारने त्यांचा सन १९७७मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव केला.

अन्नपूर्णादेवी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९१), विश्वभारती विद्यापीठाची देसीकोट्टम पदवी (१९९९), रत्न पुरस्कारासह (२००४) विविध महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: