पोलीस हुतात्मा दिन – २१ ऑक्टोबर

21 ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण देशभरात पोलीस हुतात्मा दिन (Police Commemoration Day) साजरा केला जातो.


पार्श्वभूमी –

21 ‍ऑक्टोबर 1959 रोजी CRPFचे पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात अक्साईचीनच्या दुर्गम भागात 16,000 फुटांवर असलेल्या Hot Springs या ठिकाणी गस्त घालत असलेल्या आपल्या 10 जवानांवर चिनी सैनिकांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आपल्या 10 जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना या जवानांनी अतिशय शौर्याने शत्रूंविरोधात लढा दिला. या जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून दरवर्षी  21 ‍ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते.

शिवाय, देशाची अखंडता आणि एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी, कधी नक्षल्यांविरोधात तर कधी समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात कारवाई करताना तर कधी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन नीट व्हावे म्हणून सतत जागरूकपणे आपली सेवा बजावताना, कर्तव्यात जराही कसूर न करता वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांची आठवण मनात कायम तेवत ठेऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणूनदेखील साजरा केला जातो.


Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: