पॉली उम्रीगर पुरस्कार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिला जाणारा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार म्हणजेच पॉली उम्रीगर पुरस्कार 12 जून रोजी  विराट कोहलीला प्रदान करण्यात आला आहे.

2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार विराट कोहलीला प्राप्त झाला आहे. महिलांमध्ये हरमनप्रीत कौरला 2016-17 साठी आणि स्मृती मंधानाला 2017-18 या कालावधी मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला.

Pahlan Ratanji “Polly” Umrigar या सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटर च्या स्मरणार्थ हा पुरस्कार प्रत्येक वर्षी BCCI मार्फत प्रदान केला जातो.

२०१६- १७ मधील पुरस्कारांचे मानकरी

स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : परवेझ रसूल (जम्मू-काश्मीर)
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : कृणाल पंड्या
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज: पी के पांचाळ (गुजरात)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज: शाहबाज नदीम (झारखंड)
जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : पूनम राऊत

२०१७- १८ मधील पुरस्कारांचे मानकरी
स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू : जलज सक्सेना (केरळ)
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू : दिवेश पठाणी
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज: मयांक अग्रवाल (कर्नाटक)
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज: जलज सक्सेना (केरळ)
जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू) : दीप्ती शर्मा


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: