पेप्सिकोच्या नविन CEO – रेमन लॅगार्ट

पेप्सिको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) इंदिरा नूयी यांनी १२ वर्षांनंतर निवृत्ती घेतली आहे.

इंदिरा नूयी या पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला CEO होत्या.

६२ वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रेमन लॅगार्ट या पेप्सी कंपनीच्या सहाव्या CEO असतील. रेमन लॅगार्ट या मागील २२ वर्षांपासून पेप्सिको कंपनीत कार्यरत आहेत.

त्यांनी कार्पोरेट स्ट्रॅटजी, पब्लिक पॉलिसी आदींमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या यूरोप-आफ्रिका विभागाचे सीईओपदही सांभाळले आहे.

पेप्सिको ही जगातील प्रमुख ब्रीवरेज कंपनी आहे. इंद्रा नुयी यांनी 2006 साली कंपनीच्या CEO पदाची सुत्रे आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर, कंपनीचा आर्थिक व्यवहार वाढविण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.

इंद्रा नुयी यांचा जन्म 1955 साली चेन्नईत झाला होता. त्यांचे वडिल स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये नोकरीला होते. आयआयएम कोलकाता येथून त्यांनी आपला मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. तर सन 2001 मध्ये CFO म्हणून पेप्सिको कंपनीत कामाला सुरुवात केली होती. इंद्रा नुयी यांनी रुजू होण्यापासून ते आजपर्यंत, कंपनीच्या नफ्यात 2.7 बिलियन्स डॉलर्सने वाढ होऊन तो 6.5 बिलियन्स डॉलरपर्यंत पोहोचला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: