पेटंटसाठी अर्ज करण्यात महाराष्ट्र अग्रेसर

एखाद्या क्षेत्रातील संशोधनाच्या किंवा वस्तू वापराबाबतचे स्वामित्व हक्क (पेटंट) मिळवण्यासाठी महाराष्ट्रात अधिक जागरूकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातून गेल्या वर्षी पेटंट प्राप्तीसाठी साडेतीन हजारांहून अधिक अर्ज करण्यात आले असून याबाबत राज्याने अग्रस्थान घेतले आहे.

संशोधनाची मालकी आपली असल्याबाबत सरकारी पातळीवर मिळालेली मान्यता म्हणजे ‘पेटंट’ होय.

देशाच्या नावावर सर्वाधिक ‘पेटंट’ असणे जागतिक पातळीवर बहुमानाची गोष्ट मानली जाते. राज्यातून गेल्या वर्षी पेटंटसाठी तब्बल ३,५१३ अर्ज करण्यात आले आहेत. मात्र, २०१५-१६च्या तुलनेत महाराष्ट्रातून ४ टक्के पेटंट अर्ज  कमी दाखल झाले आहेत.

पेटंटसाठी अर्ज करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे तर सर्वात पिछाडीवर हिमाचल प्रदेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू २००३ अर्जासह दुसऱ्या तर कर्नाटक १७६४ पेटंट अर्जासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातून सर्वाधिक १९,६४० पेटंट अर्ज इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स संबंधित विषयात दाखल झाले आहेत

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: