पॅन कार्डमधील महत्वाचा बदल

पॅन कार्डवर वडिलांचे नाव अनिवार्य असण्याचा नियम आता बदलणार आहे. यानुसार कलम ११४मध्ये बदल सुचविणारा एक मसुदा प्राप्तिकर खात्याने जारी केला असून त्यावर १७ सप्टेंबरपर्यंत हरकती मागवल्या आहेत.

यानंतर हा नियमबदल अस्तित्वात येईल. पॅन कार्ड वितरित करण्यासाठी कोणकोणत्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे याचा तपशील प्राप्तिकर अधिनियम १९६२च्या कलम ११४मध्ये नमूद करण्यात आला आहे.

एकल मातांच्या मुलांनाही पॅन कार्डसाठी अर्ज करताना वडिलांचे नाव नमूद करणे सक्तीचे होते. त्यामुळे अनेकांची कुचंबणा व अडचण होत होती. त्यामुळे एकल माता असणाऱ्या महिलांच्या मुलांना यातून मोठा दिलासा मिळणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: