‘पिनाका’ क्षेपणास्त्राचे सफल परीक्षण

ओडिशामधील चांदीपूर येथे पिनाका या क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची (पिनाका मार्क-२) यशस्वी चाचणी घेण्यात आली. दिशा निर्देशन प्रणाली (गाइडेड) असलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढविण्यात आली आहे.

यापूर्वीच्या पिनाका मार्क-१ या आवृत्तीमध्ये दिशानिर्देशन प्रणालीचे वैशिष्ट्य उपलब्ध नव्हते. तसेच पिनाका मार्क-१ या क्षेपणास्त्राचा पल्ला ४० किमी इतका होता.

नवीन पिनाका मार्क-२ ही आवृत्ती दिशानिर्देशन प्रणालीने सुसज्ज असून या क्षेपणास्त्राचा पल्ला ७० किमी इतका आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: