पहिली काश्मिरी मुस्लीम महिला वैमानिक

तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होत आहे.

व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवण्यासाठी इरम सध्या दिल्लीमध्ये प्रशिक्षण घेत असून वैमानिकाचं प्रशिक्षण तिनं दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील मयामी इथं घेतलेलं आहे.

दोन वर्षांपूर्वी तन्वी रैना या काश्मिरी पंडित कुटुंबातील मुलीनं वैमानिक होत काश्मीरमधली पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता. तर गेल्या वर्षी आयेषा अझीज या एकवीस वर्षीय तरूणीनं भारतातली सगळ्यात तरूण विद्यार्थी वैमानिक ठरण्याचा मान मिळवला होता.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: