‘पश्चिम बंगाल’ ते ‘बांगला’

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारने पश्चिम बंगालचे नाव बदलून बांगला असे ठेवण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे.

पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचे राज्य सरकारने दिलेल्या मुख्य कारण हे आहे की, जेव्हा सर्व राज्यांची बैठक असते, त्यावेळी वर्णानुरुपानुसार (by alphabetical order) पश्चिम बंगालचे नाव यादीमध्ये तळाशी आढळते.

नावामध्ये बदल मंजूर झाल्यावर हेच स्थान शेवटवरून आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांखालोखाल चौथ्या क्रमांकावर येऊ शकेल.

पश्चिम बंगालचे नाव रुपांतर करण्याचा प्रस्ताव पश्चिम बंगाल विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. आता हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविला जाईल. जर गृह मंत्रालयाने प्रस्ताव मान्य केला तर पश्चिम बंगालचे नाव बदलून बंगाली ठेवण्यात येईल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: