पब्लिक अफेअर्स इंडेक्स 2018

पब्लिक अफेअर्स सेंटरच्या 2018 च्या पब्लिक अफेअर्स इंडेक्स नुसार सर्वोत्तम राज्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पीएसीच्या पब्लिक अफेअर्स इंडेक्स (PAI) या सर्व्हेसाठी राज्यांचा पायाभूत विकास, मानवी निर्देंशांक, सामाजिक स्वास्थ्य, महिला आणि बालकल्याण दर,पारदर्शकता आणि उत्तरदायित्व,व कायदा सुव्यवस्थेचा विचार अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करण्यात येतो.

सदर यादीमध्ये केरळ प्रथम क्रमांकावर असून केरळने 2016 पासून सलग तीन वर्ष पहिला क्रमांक मिळवला आहे.

पीएसीच्या 2018 च्या पब्लिक अफेअर्स इंडेक्स मध्ये केरळ नंतर दुसऱ्या स्थानी तामिळनाडू राज्य व तिसऱ्या स्थानी तेलंगणा राज्य आहे.

पीएसीच्या पब्लिक अफेअर्स इंडेक्सच्या क्रमवारीत मध्यप्रदेश शेवटच्या स्थानी आहे.

तसेच लहान मुलांसाठी चांगले जीवनमान असणाऱ्या राज्यात केरळ राज्य पहिल्या स्थानी त्यानंतर हिमाचल प्रदेश राज्य व मिझोराम राज्याचा क्रमांक लागतो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: