पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या ‘चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्काराने गौरव केला आहे.

‘पॉलिटिकल लीडरशीप’ या विभागात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला असून त्यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना पर्यावरणसंबंधी जागतिक करार करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींना २०२२ पर्यंत देशात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्धाराबद्दल हा पुरस्कार दिला आहे.

पर्यावरणसंदर्भात जागतिक स्तरावर प्रभावी नेतृत्व म्हणून नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २०२२ पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा दृढनिश्चय केल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.

केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही पुरस्कार देण्यात आला आहे. अक्षय उर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. केरळमधील कोच्ची आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पूर्णपणे सौरउर्जेवर चालणारे विमानतळ आहे.

यावर्षी ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ अवार्ड’ हा सन्मान’ सहा विजेत्यांना दिला गेला आहे. अन्य चार विजेते म्हणजे –

विज्ञान आणि अभिनवता श्रेणीत – ‘बियोन्ड मीट’ आणि ‘इंपॉसिबल फूड्स’

प्रेरणा आणि कृती – चीनच्या झेजियांग प्रांतातला ‘ग्रीन रूरल रिव्हायवल प्रोग्राम’

उद्योजक दृष्टी – कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (भारताचे ग्रीनफील्ड विमानतळ)

जीवनगौरव पुरस्कार – जोएन कार्लिंग

‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ –

संयुक्त राष्ट्रसंघाचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UN Environment) तर्फे 2005 साली या वार्षिक पुरस्काराची स्थापना करण्यात आली.

हा पुरस्कार ज्याच्या कृतीमुळे पर्यावरणावर सकारात्मक बाजूने परिवर्तनात्मक प्रभाव पडला आहे अशा सार्वजनिक आणि खाजगी क्षेञातील आणि नागरी समुदायातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीत्व/उपक्रम/पुढाकाराला दिला जातो.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: