न्या. एम. बी. लोकूर

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश मदन भीमराव लोकूर यांची भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) याचे कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती केली आहे.

न्यायमूर्ती लोकूर यांनी ३ ऑक्टोबरपासुन पदभार स्वीकारला असून ते सर्वोच्च न्यायातील चार वरिष्ठ न्यायाधिशांपैकी एक होते. जून २०१२ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (NALSA) –

५ डिसेंबर १९९५ रोजी ‘कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम – १९८७’ याच्या अधिकृततेखाली भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली.

पात्र उमेदवारांना विनामूल्य कायदेशीर सेवा पुरविणे आणि प्रकरणांच्या वेगवान निराकरणासाठी लोकअदालत आयोजित करणे हा या प्राधिकरणाचा हेतू आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: