न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण

न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. याची सुरूवात सुप्रीम कोर्टातूनच होणार असून यामुळे न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता येणार आहे.

घटनात्मक आणि सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान थेट प्रसारण झाले पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

या याचिकेवर बुधवारी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांनी न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय दिला.

तसेच जनतेचे अधिकार आणि याचिकाकर्त्यांच्या अधिकारांचेही उल्लंघन होणार नाही, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केले जातील, असे कोर्टाने सांगितले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: