नेपाळमधील वाघांच्या संख्येत दुप्पटीने वाढ

वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ), या वन्यजीव संरक्षण आणि लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या प्रजातींशी निगडीत असलेल्या संस्थेचा अहवाल नुकताच प्रसिध्द झाला आहे. यानुसार, राष्ट्रांतर्गत वाघांच्या संख्येत दुप्पटीने वाढ करण्यात यशस्वी ठरणारे नेपाळ हे पहिले राष्ट्र ठरले आहे.

२०१० सालच्या टीएक्स-२ या कार्यक्रमा अंतर्गत सर्व राष्ट्रांनी २०२२ पर्यंत आपल्या क्षेत्रातील वाघांची संख्या दुप्पटीने वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सर्वेक्षणानुसार २००९ साली येथील वाघांची संख्या १२१ च्या आसपास होती. आता ती २३५ पर्यंत पोहोचली आहे.

नेपाळमधील वाघांच्या संख्येतील ही वाढ आपण एकत्र काम केल्यास वन्यजीव वाचवू शकतो. याचा पुरावा असल्याचे डब्ल्यूडब्ल्यूएफ-यूएस बोर्डाचे सदस्य आणि लिओनार्डो डीकॅप्रियो फाउंडेशनचे अध्यक्ष लिओनार्डो डीकॅप्रियो यांनी म्हटले आहे. त्यांची संस्था या मोहीमेत वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंडची भागिदार आहे.

2022 सालापर्यंत जगातल्या वन्य वाघांची संख्या दुप्पट करण्याच्या हेतूने, 2010 साली सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या ‘व्याघ्र शिखर परिषद’मध्ये महत्वाकांक्षी ‘TX2’ हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

नेपाळ हा एक दक्षिण आशियाई भूवेष्टित  भारताचा शेजारी देश आहे. ‎काठमांडू ही देशाची राजधानी असून नेपाळी रुपया (NPR) हे राष्ट्रीय चलन आहे

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: