निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी ‘स्वतंत्र यंत्रणा’

सरकारच्या नियंत्रणाबाहेर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी ‘स्वतंत्र यंत्रणा’ तयार करण्याकरिता दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याचिका संवैधानिक पिठाकडे सोपवली आहे.


भारतीय निवडणूक आयोग (ECI) –

भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व निम-न्यायिक संस्था असून ECI ची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली.


सदस्यांची रचना –

आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. 1989 साली या दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.

निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत. ECI वर संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.


ओम प्रकाश रावत हे भारताचे वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: