निर्माण कुसुम योजना

निर्माण कुसुम योजना –

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 6 ऑक्टोबर रोजी या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेसाठी 1.09 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये –

१) सुमारे 1878 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ

२)ITI विद्यार्थ्यांना 23,600 रुपये वार्षिक आर्थिक साहाय्य

३) डिप्लोमा विद्यार्थ्यांना 26,300 रुपये वार्षिक आर्थिक साहाय्य

४) मुलींसाठी सरकारने या प्रोत्साहनपर रक्कमेमध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय घेतला असून मुलींसाठी आर्थिक सहाय्य इयत्ता सहावीपासून पदवीपर्यंत दिले जाणार आहे.

५) कामगारांच्या मृत्यूपश्चात देण्यात येणारी रक्कम 1 लाख रुपयांहून वाढवून 2 लाख रुपये केली आहे.

६) कामगारांना अपघात झाल्यावर मिळणारी मदत 2 लाख रुपयांहून वाढवून 4 लाख रुपये केली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: