[नियुक्ती] सुधा बालकृष्णन: : RBI च्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (CFO)

सुधा बालकृष्णन यांना भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याच्या प्रथम मुख्य वित्तीय अधिकारी (chief financial officer) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ही नेमणूक 15 मे 2018 पासून लागू करण्यात आली आहे.

या नियुक्तीपूर्वी सुधा बालकृष्णन नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या कार्यकारी अधिकारी होत्या. त्या RBI मध्ये 12 व्या कार्यकारी संचालक असतील आणि त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. सप्टेंबर 2016 मध्ये गव्हर्नर उर्जित पटेल पदावर आल्यानंतर ही सर्वात मोठी संस्थात्मक बदलाची घटना समजली जात आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले.मूळ भागभांडवलाची प्रत्येकी 100 समभागामध्ये विभागणी झालेली आहे, जे की सुरुवातीला खाजगी भागधारकांच्या पूर्णपणे मालकीचे होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: