निधनवार्ता – ऍना राजम मल्होत्रा

स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ऍना राजम मल्होत्रा (वय 91) यांचे 17 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

ऍना राजम मल्होत्रा यांचा जीवनपरिचय –

ऍना यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात 1927 ला झाला होता. कोझीकोडे येथे शालेय शिक्षण झाल्यावर त्या पुढील शिक्षणासाठी चेन्नईला आल्या.

1951 मध्ये त्या नागरी सेवेत दाखल झाल्या. मद्रास केडर निवडून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री सी. राजगोपालचारी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनात कामाला सुरवात केली. नंतर त्यांनी आर. एन. मल्होत्रा यांच्याशी विवाह केला. आर. एन. मल्होत्रा 1985 ते 1990 या काळात भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते.

मुंबईजवळील “जेएनपीटी’ बंदर विकासात त्यांची मोठी भूमिका होती. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) उभारणीवेळी ऍना या ट्रस्टच्या अध्यक्षा होत्या.

ऍना मल्होत्रा यांनी तमिळनाडूच्या सात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आशियाई खेळांचे नियोजन त्यांच्याकडे होते. त्या वेळी त्यांनी राजीव गांधी यांच्याबरोबरही काम केले.

निवृत्तीनंतर त्या हॉटेल लीला व्हेंचरच्या संचालक म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी सेवेत असताना केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून 1989 मध्ये त्यांना पद्मभूषण किताब देऊन सरकारने गौरविले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: