नासाचे पहिले व्यायवसायिक उड्डाण

नासाच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश वाहनातून होणाऱ्या उड्डाणासाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आली असून त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स हिचा समावेश करण्यात आला आहे.

सुनीता विल्यम्स हिच्याबरोबर रॉबर्ट बेनकेन, एरिक बो व डग्लस हर्ले यांची निवड झाली असून त्यांना व्यावसायिक उड्डाणासाठी प्रशिक्षण दिले जाईल.

खासगी क्षेत्राने तयार केलेल्या अवकाश वाहनातून हे अवकाशयात्री अंतराळात जातील. पृथ्वीनिकटच्या कक्षेत सामान घेऊन जाण्यासाठी हे वाहन उपयोगी पडणार असून २०३० पर्यंत मंगळावर जाण्याचे उद्दिष्ट गाठण्याची ती पहिली पायरी मानली जात आहे.

हे चारही अवकाशयात्री बोईंग कंपनी व स्पेस एक्स यांच्याबरोबर  काम करणार आहेत.

सुनीता विल्यम्स -

सुनीता विल्यम्स ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत.

तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले होते.

महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे.

२०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: