नायट्रोजन प्रदूषणाचे भारतातले पहिले परिमाणात्मक मूल्यांकन जाहीर

भारतात केले गेलेले नायट्रोजन प्रदूषणाचे पहिले-वहिले परिमाणात्मक मूल्यांकन जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार हृदयरोग आणि श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरणार्या PM2.5 या प्रदूषकाच्या वर्गामधील सर्वात मोठा घटक म्हणजे नायट्रोजन कण हा आहे.

  • कृषी क्षेत्रातून वातावरणात वर्षाला 240 दशलक्ष किलोहून अधिक नायट्रोजन ऑक्साइड (NOx) आणि सुमारे 7 दशलक्ष किलो नायट्रस ऑक्साईड (N2O) चे उत्सर्जन होते.
  • कृषी क्षेत्राव्यतिरिक्त NOx आणि N2Oचे उत्सर्जन वेगाने वाढत आहे, जे वीजनिर्मिती, वाहतूक आणि उद्योगांमधून सांडपाणी आणि जीवाश्म इंधनामुळे धुराच्या स्वरुपात बाहेर पडते.
  • सन 1991 ते सन 2001 या कालावधीत भारतातले NOx चे उत्सर्जन 52% ने वाढले, तर सन 2001 ते सन 2011 दरम्यान हे प्रमाण 69% होते.
  • गैर-कृषी स्रोतांपासून NOx चे वार्षिक उत्सर्जन सध्या 6.5% दराने वाढत आहे.
  • 2010 साली 70% पेक्षा अधिक N2Oचे उत्सर्जन शेतजमिनीमधून झाले होते, त्यापाठोपाठ सांडपाणी (12%) आणि निवासी आणि व्यावसायिक उपक्रम (6%) हे उत्सर्जक आहेत.
  • 2002 सालापासून, N2O ने भारतीय शेतीमधील दुसऱ्या क्रमांकाचा हरितगृह वायू (GHG) असलेल्या मिथेनची जागा घेतली आहे.

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: