नद्या प्रदूषणाची पातळी गंभीर

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) केलेल्या सर्वेक्षणानुसार भारताच्या नदींमधील प्रदूषित पात्रांची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या 302 वरून 351 एवढी झाली आहे.

2015 सालच्या अहवालात, CPCB ने 275 नद्यांमधील 302 प्रदूषित पात्रांना ओळखले होते, जे 28 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत.

पाण्याच्या गुणवत्ता पातळीत अत्याधिक घट असलेल्या गंभीरपणे दूषित पात्रांची संख्या 34 वरून 45 वर पोहचलेली आहे.

बिहार, उत्तरप्रदेश या राज्यामधील पात्रांच्या प्रदूषणाची पातळी महाराष्ट्र, आसाम, गुजरात या तीन राज्यांच्या तुलनेत कमी आहे. 351 प्रदूषित पात्रांपैकी 117 या तीन राज्यांमध्ये आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंड (CPCB) ही केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. 1974 साली याची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: