नऊ जिल्ह्यांना पाइपद्वारे गॅस

राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील २०.५८ लाख कुटुंबांना पाइपने स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा होणार आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियमन मंडळाने (PNGRB) त्यासाठी तीन कंपन्यांची निवड केली आहे. यामुळे या कुटुंबांना एलपीजी सिलिंडरची गरज भासणार नाही.

या योजनेत राज्यातील पुढील ९ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे –

१. अहमदनगर

२. औरंगाबाद

३. धुळे

४. नाशिक

५. लातूर

६. उस्मानाबाद

७. सांगली

८. सातारा

९. सिंधुदुर्ग


भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडला अहमदनगर व औरंगाबाद आणि सातारा व सांगली या जिल्ह्यांसाठी संयुक्त कंत्राट मिळाले आहे.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला धुळे व नाशिक जिल्ह्याला पुरवठा करण्याचे संयुक्त कंत्राटासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठ्याचेही कंत्राट मिळाले आहे.

युनिसन एन्वायरो प्रायव्हेट लिमिटेडला लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या गॅस पुरवठ्याचे कंत्राट मिळाले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: