धर्म गार्डियन – २०१८

भारत-जपान संयुक्त लष्करी सराव

नाव : धर्म गार्डियन – २०१८

स्थान : वेरंगटे (मिझोराम) ,भारत

कालावधी : १ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर

सहभागी देश : भारत व जपान

जपान –

Image result for जपान मॅप

जपान हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत.

जपानी भाषेत “जपान” या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा अर्थ “सूर्य उगम” असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.

जपान प्रशांत महासागरामधील एकूण ६,८५२ बेटांवर वसला असून होन्शू, क्युशू, शिकोकू व होक्कायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत.

सुमारे १२.८ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो. टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे.

प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीनच्या खालोखाल) आहे.

येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेले लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ९८.५% लोक हे जपानचे मूळ निवासी आहेत.

 

 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: