देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा

२०११ मधील जनगणनेच्या आधारे देशातील कोणती भाषा किती बोलली जाते याची यादी तयार करण्यात आली आहे. यानुसार भारतातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा –

हिंदी भाषा पहिल्या स्थानावर असून हिंदी बोलणाऱ्यांची प्रमाण २००१ च्या तुलनेत वाढले आहे. २००१ मध्ये हिंदी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ४१. ०३ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ४३. ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

बंगाली भाषा दुसऱ्या स्थानी आहे. बंगाली मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ८. १ टक्क्यांवरुन ८. ३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण २००१ च्या तुलनेत २०११ मध्ये वाढले आहे. २००१ मध्ये मराठी मातृभाषा असलेल्यांचे प्रमाण ६.९९ टक्के होते. २०११ मध्ये हे प्रमाण ७.०९ टक्क्यांवर पोहोचले. मराठी भाषा ही जगात १८ क्रमांकावर असून भारतातील तिसऱ्या क्रमांची भाषा आहे. महाराष्ट्र राज्यातील अधिकृत भाषा मराठी आहे. मराठी ही राज्यभाषा आहे.

गुजराती भाषा सहाव्या स्थानी आहे.

मातृभाषेच्या यादीत उर्दू सातव्या स्थानी असून २००१ मध्ये उर्दू भाषा सहाव्या स्थानी होती.

देशातील २. ६ लाख लोकांनी इंग्रजी ही मातृभाषा असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यातील  १. ०६ लाख लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे. इंग्रजी प्रथम बोली भाषा मानणाऱ्यांमध्ये तामिळनाडू दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे.

देशातील छोट्या छोट्या 22 भाषांपैकी संस्कृत भाषा ही सर्वात कमी लोकांची मातृभाषा आहे. बोडो, मणिपुरी, कोंकणी आणि डोगरी या भाषांपेक्षाही संस्कृत कमी बोलली जाते.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: