देशात एफडीसी औषधांवर बंदी

केंद्र सरकारडून 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. या औषधांची विक्री आता देशात होणार नाही. आजार लवकर बरा व्हावा यासाठी, अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने या प्रकारच्या 328 औषधांवर बंदी आणली आहे. सॅरिडॉन, डिकोल्ड, विक्स अॅक्शन-500, कोरेक्स, सुमो, जिरोडॉल, फेंसिडील, जिंटाप यासारथ्या अॅन्टिबायोटिक्स, पेन किलर्सशी संबंधीत औषधांचा यामध्ये समावेश आहे.

अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: