देशातील सहा उच्च शैक्षणिक संस्थांना ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’ दर्जा

केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’साठी शिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी गोपालस्वामी समिती नियुक्त केली होती. देशातील ‘शैक्षणिक श्रेष्ठते’चा दर्जा असण्याची क्षमता असलेल्या १० सरकारी आणि १० खासगी अशा २० संस्थांची निवड करण्यास समितीला सांगण्यात आले होते. मात्र ‘श्रेष्ठता’ दर्जा देता येईल अशा वीस संस्था समितीला न सापडल्याने फक्त सहा शिक्षण संस्थांचीच निवड करण्यात आली आहे.

या ‘श्रेष्ठत्व’ दर्जा मिळालेल्या संस्थांना पुढील पाच वर्षांत १ हजार कोटींचा विशेष निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तताही मिळणार आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: