देशातील पहिली फ्युनिक्यूलर ट्रॉली

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या व समुद्र सपाटीपासून 12 हजार मीटर उंचीवर वसलेल्या सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिल्या फ्युनिक्यूलर ट्रॉलीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

फ्युनिक्यूलर ट्रॉलीची रचना – 

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आणि मेक इन इंडिया अंतर्गत या ट्रॉलीचं काम हाती घेण्यात आले होते. रशियन तंत्रज्ञानाची मदत घेऊन रोप वे बनवण्यात आला आहे.

एका वेळी 60 भाविक या ट्रॉलीमधून प्रवास करु शकतात.

ट्रॉलीला एकूण नऊ ब्रेक्स बसवण्यात आले आहेत. एका वेळी दोन-तीन ब्रेक फेल झाले तरी देखील उर्वरित ब्रेक आपली कार्य चोख बजावतात.

एका रोपला सपोर्ट करण्यासाठी आणखी एक रोप टाकण्यात आला आहे. तांत्रिक अडचण आल्यास सिक्युरिटी अलार्म वाजतो.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सर्वात सुखकर होणार आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आल्या असून तीन लिफ्ट जोडण्यात आल्या आहेत.

सप्तश्रुंगी गडाला 550 पायऱ्या असून पायथ्यापासून देवीच्या गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी महिला ज्येष्ठ नागरिकांना याआधी दीड ते दोन तास वेळ लागायचा. परंतु आता रोप-वे चा वापर करून अवघ्या दीड मिनिटात भाविक मंदिरापर्यंत पोहोचू शकणार आहेत.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: