देशातील पहिली ‘इंटरनेट टेलीफोन’ सेवा

सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL ने देशात पहिल्यांदाच इंटरनेट टेलीफोनी सेवेची सुरूवात केली आहे.

या सेवेअंतर्गत बीएसएनएलचे ग्राहक मोबाइल अॅपद्वारे देशभरात कोणत्याही फोन क्रमांकावर कॉल करु शकतात. यासाठी बीएसएनएल ग्राहकांनी केवळ मोबाइल अॅप Wings डाउनलोड करण्याची गरज आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी ही सेवा लॉन्च केली.

चालू आठवड्यापासूनच या सेवेसाठी नोंदणी सुरू होत असून 25 जुलैपासून ही सेवा सुरू होईल.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: