देना, विजया आणि बडोदा बँकेचे विलीनीकरण

सार्वजनिक क्षेत्रातील देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदाचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.


सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी बँकिंग क्षेत्राच्या अमूल्य योगदानाची अपेक्षा या पार्श्वभूमीवर ही विलीनीकरणाची घोषणा करण्यात आली आहे.


विलीनीकरणाच्या प्रक्रियेत बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नसल्याची ग्वाही देत पूर्वीच्या सर्व सेवा व अटी त्यांना लागू केले जातील.


विलीनीकरणानंतर ही बँक देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक ठरणार आहे.


 

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: