दुसरी जागतिक हिंदू परिषद

अमेरिकेतील शिकागो शहरामध्ये इलिनोइस येथे दुसरी ‘जागतिक हिंदू परिषद’ (World Hindu Congress) आयोजित करण्यात आली आहे.

ही परिषद 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर 2018 या काळात भरविण्यात आली आहे.

तुलसी गबार्ड या परिषदेच्या अध्यक्षा आहेत.

1893 साली जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘सुमनत्रिते सुवीक्रांते’ या विषयाखाली ही परिषद भरविण्यात आली आहे.

जागतिक हिंदू परिषद -

जागतिक हिंदू परिषदेचे (WHC) आयोजन वर्ल्ड हिंदू फाउंडेशनतर्फे केले जाते.

प्रत्येक चार वर्षानंतर आयोजित केली जाणारी जागतिक हिंदू परिषद हे एक वैश्विक मंच आहे, जेथे हिंदू समुदायाचे व्यक्ती एकमेकांशी त्यांच्या विचारांचे आदानप्रदान करतात.

पहिली परिषद 2014 मध्ये नवी दिल्ली येथे भरविण्यात आली होती.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: