दुष्काळाबाबतचे नवीन नियम जाहीर

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विचार करत दुष्काळ जाहीर करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या नवीन निर्णयानुसार,

पेरणीच्या सरासरी तुलनेत 15 टक्के घट झाली तरी दुष्काळ जाहीर केला जाणार आहे.

याआधी ऑगस्टपर्यंत सरासरी पेरणीत 33.33 टक्के घट झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची अट होती, तर 50 टक्क्यापेक्षा कमी पेरणी झाली असेल तर गंभीर दुष्काळ जाहीर करण्याची अट होती.

सरकारने या जुन्या अटी शिथील करत आता पेरणीत सरासरीच्या तुलनेत 15 टक्के घट झाली असेल तर दुष्काळ आणि 25 टक्क्यांहून अधिक घट झाली असेल तर गंभीर दुष्काळ जाहीर करण्याचे ठरवले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: