त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे नामकरण

केंद्रीय मंत्रिमंडळाने त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे ‘महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ, आगरतळा’ असे नामकरण करायला मंजुरी दिली आहे.

महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर हे १९२३ साली त्रिपुरा संस्थानाचे संस्थानिक म्हणून पदभार सांभाळत होते. महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर यांनी दान म्हणून दिलेल्या जमिनीवर १९४२ साली आगरतळा विमानतळ उभारण्यात आले होते.

त्रिपुरातील जनतेकडून प्रदीर्घ काळ होत असलेली मागणी लक्षात घेऊन तसेच महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर यांना त्रिपुरा सरकारची आदरांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: