तेलंगणामध्ये मुदतपूर्व विधानसभा बरखास्त

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा विधानसभा मुदतीआधी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेलंगणा राज्यात तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाचे सरकार आहे. या सरकारचा कार्यकाळ मे 2019 पर्यंत होता.

2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांचा व राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा परिणाम तेलंगणा विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो, अशी शक्यता राव यांनी व्यक्त केली. यामुळे मुदतपूर्व विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय राव यांनी घेतला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी राज्यपाल एस. एल. नरसिंहन यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यपाल नरसिंहन यांनी राव यांचा प्रस्ताव स्वीकारला असून तरीही त्यांना नवीन मुख्यमंत्री येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगितले आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: