तीन महापाषाणयुगीन स्थळांचा शोध

इतिहास अभ्यासक अमित भगत यांना चंद्रपूर, भंडारा जिल्ह्य़ात बृहदाश्मयुगीन महापाषाणयुग काळातील तीन नवीन स्थळे आढळून आली आहेत. यात चंद्रपूर जिल्हय़ातील कसर्लामांगली तर भंडारा जिल्हय़ातील चन्नेवाडा या स्थळांचा समावेश आहे. याचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व १५०० ते इसवी सन पूर्व २०० यादरम्यानचा असावा, असा अंदाज अमित भगत यांनी व्यक्त केला.

अमित भगत यांचे संशोधन -

भगत यांनी आतापर्यंत पाच बृहदाश्मयुगीन संस्कृतीची स्थळे शोधली आहेत. यामध्ये डोंगरगाव, नवखळा, कोरंबी, बनवाही व भंडारा येथील चांदी या स्थळांचा समावेश आहे.

भाारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने सुद्धा त्यांच्या या संशोधनाची विशेष दखल घेतलेली असून तत्संबंधीचा उत्खननाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

अमित भगत यांना आठ स्थळांवर मानवी वसाहतीचा सबळ पुरावा म्हणून सूक्ष्मपाषाणाची हत्यारे, काळय़ा, तांबडय़ा, करडय़ा रंगांची अभ्रकयुक्त खापरे व प्राचीन लोहभट्टीचे अवशेष आढळून आले आहे.

कसर्ला –

कसर्ला येथील ‘झिकाटीची हुडकी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर चार विशाल शिलास्तंभ आढळून आले असून त्यातील सर्वात मोठय़ा शिलास्तंभाची उंची २.१ मीटर, रूंदी १.६ मीटर व जाडी १७ से.मी. आहे.

मांगली –

मांगली गावानजीकच्या जंगलात चंद्रपूर व भंडारा जिल्हय़ाच्या सीमेजवळ ७ स्लॅबवर्तुळे, दोन शीलावर्तुळे, पाच शिलापेटिका व एक शिलास्तंभ आढळून आले आहेत.

चन्नेवाडा –

भंडारा जिल्हय़ात समावेश होणाऱ्या चन्नेवाडा गावानजीकच्या जंगलात तीन स्लॅबवर्तुळे, तीन शिलापेटिका व अनेक लहान स्लॅबरूपी शिलास्तंभ आढळून आले आहेत. ही स्थळे  हत्यारनिर्मिती कारखान्याची असण्याची दाट शक्यता आहे.

Share

ADD YOUR COMMENT

Your email address will not be published. Required fields are marked *

error: